Saturday, 22 December 2012

श्री नरसिंह संचारेश्वर पाचलेगावकर महाराज संक्षिप्त चरित्र कथा सार स्तोत्र


Shri Narsinha Sanchareshwar Pachle Gavkar Maharaj sankshipt charitra katha saar stotra

 || श्री नरसिंह संचारेश्वर पाचलेगावकर महाराज संक्षिप्त चरित्र कथा सार स्तोत्र ||

श्री गणेशाय नमः | श्री प्रयाग माधवाय नमः | श्री दुर्गा देव्यै नमः | श्री विन्ध्यवासिनीदेव्यै नमः ||१||
श्रीगुरुभ्यो नमः | श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामी नमः | श्रीमाधवनाथस्वामी नमः | श्रीसंचारेश्वर नमः ||२||
ही आहे श्रीगुरु प्रेरणा | लिहावया स्तोत्र रचना | सुरेश हा निमित्त जाणा | श्री सरस्वतींस वंदितो ||३||   
भारत ही ऋषींची भूमी | भारत ही संतांची भूमी | शूर देशभक्तांची भूमी | पवित्र पावन भारत माता ||४||
निवृत्त्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई | संत शिष्यांची असे आई | पद स्पर्शाने पावन होई | महाराष्ट्र संतभूमी ||५||
वडील श्री राजाराम पंत | आई कृष्णाबाई देव भक्त | सुशील हे दाम्पत्य | रहात होते पाचले गावी ||६||
८/११/१९१२
भगवद भक्त दाम्प-त्यापोटी | महाराष्ट्र पुण्य भूमीवरती | जन कल्याणासाठी | बालक एक जन्मले ||७||
शके अठराशे चौतींस | अश्विन कृष्ण चतुर्दशींस | मंगल प्रभाती समयांस | सुपुत्र हा अवतरला ||८||
नरक चतुर्दशी,उत्सव दिवाळी | असुरांची करण्या होळी | दिव्य शक्ती ही अवतरली | मानव देही ||९||
पाचले गाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणीत | महाराष्ट्र पावन भूमीत | भारत देशांत | संतबीज रुजले ||१०||
हिंदू संस्कृती प्रमाणे सगळे | नामकरण विधी झाले | नरसिंह असे नाव ठेविले | लहान बाळाचे ||११||
बाळ पाचले गावात वाढले | काहि महिन्यांचे झाले | तेव्हा दत्त वाडीचे तपस्वी आलें | श्री माधवाश्रम स्वामी ||१२||
स्वामिनी बाळांस पाहिले | अतींद्रिय ज्ञानाने जाणले | संचारेश्वर संबोधिले | परतले पाचले गावातून ||१३||
नृसिंह खोडकर मूर्ती | पुराण, भजन बाळाची आवडी | नारू,अप्पा पावश्या,धोंडू आदी | मित्र चार विविध जातीचे ||१४||
सवंगडी सोबती असताना | त्यांना दूध पाजल्याविना | बाळ कधीच दूध घेईना | दूध पाजी आधी मित्रांसी ||१५||
शाळेची आवड बाळांस नव्हती | शाळेतून पळ काढती | मुक्तेश्वर स्वयंभू पिंडीजवळ जमती | सवंगड्या सोबत ||१६||
गावात काहीना व्यसन जडले | श्री तेव्हा खूप चिडले | दारूच्या मडक्यात मातीस टाकले | राग येउनी ||१७||
महाराज नेसती लंगोटी | लोक आदराने कौतुक करती | अंगा खांद्यावर घेऊन फिरती | पाचले गावात ||१८||
आठव्या वर्षीची गोष्ट ऐका | नाग पंचमीचा दिवस बर का | खरा नाग पूजेसाठी आणू का | नृसिंहाने विचारले ?||१९||
आईने सहज हो म्हंटले | श्री खरांच नाग घेऊन आलें | सर्व लोक भीतीने पाळले | खरा नाग पाहतां ||२०||
आता नाग पूजावा कोणी | नागांस खाली ठेउनी | नागांस पूजिले स्वतः श्रींनी | श्री झाले नागधारी ||२१||
ज्योतिर्लिंग औंढा,नागनाथ,ओंकारेश्वर | अभिषेक करता शंकरावर | प्रत्यक्ष नाग ठेविला पिंडीवर | पाहिला अनेकांनी ||२२||
भस्म अंगारा फासला | गुरूंचा अनुग्रह झाला |श्रीमाधवाश्रमांनी संस्कार केला | पाचले गावांत ||२३||
श्रींना चुलत बंधु होता | त्याच्या मुंजीचा विषय होता | नृसिंहांच्या लग्नाचाही विषय होता | तेव्हा एक घटना घडली ||२४||
भक्तीत रममाण असतां | एक दृष्टांत झाला होतां | सगळ्याना तो सांगितला होतां | श्रींनी घरी येऊन ||२५||
माझे लग्न नाही होणार | आगीमधे घर जळणार | आजी आगीमधे राख होणार | असा होतां दृष्टांत ||२६||
हे ऐकून सगळे चिडले | श्रींना दूषण देऊ लागले | पण व्हायचे तेच झाले | घर जळले आगीमधे ||२७||
घराचे भस्म अंगास लाविले | श्रीबाबा घराबाहेर पडले | तीर्थक्षेत्री राहिले | औंढा, लोणार आदी स्थानी ||२८||
नंतर श्रीबाबा महाराज | श्री छोटे महाराज | श्री पाचलेगावकर महाराज | अशा नावानी प्रसिद्ध झाले ||२९||
राष्ट्रीय जीवनास स्वीकारले | देश पर्यटनाने कल्याण साधले | न्यायासाठी लढले | श्री बाबा महाराज ||३०||
मातृभूमी होती पारतंत्र्यात | जन करण्या संघटीत | महाराज मिसळले समाजात | बालमूर्ती तेरा वर्षीय ||३१||
लोकं जमू लागले | श्रींजवळ वावरू लागले | यज्ञाच्या तयारीस लागले | श्रींच्या इच्छेनुसार ||३२||
परकीयांविरुद्ध एल्गार केला | रुद्र स्वाहाकार पूर्ण झाला | राष्ट्र धर्माचा पाया रचला | तेराव्या वर्षी ||३३||
सर्वत्र श्रींची कीर्ती झाली | भूमी होती निजाम अमलाखाली |  निजामाने माणसे धाडली | पैसे देण्यासाठी ||३४||
शिवराम बहादूर जहागीर मंडळी | श्रीना नेण्यांस आली | श्रींनी संपत्ती वाटली | गोर गरिबांस ||३५||
श्री गेले फिरत फिरत | पोहचले हैदराबादेत | निजाम झाला प्रभावित | बालरूप ते पाहून ||३६||
बाबांस करोडगिरी कर माफ केला |  रेल्वे प्रवास मोफत दिला | दोन पोलीस सोबतिला | दिले निजामाने ||३७||
देशांत होती हलाखी | धर्म अर्थ जाती यांची | विषमता समाजात होती | शिगेला पोचलेली ||३८||
महाराजांनी अवलोकन केले | जन जागृत केले | पालखी सोहळे आयोजिले | पाचलेगाव, लोणी इथे ||३९||
पाहुनी लुबाडणूक धर्मांतरण | श्रींचे द्रवले अन्तःकरण | करीन मी धर्मरक्षण | केली त्यांनी प्रतिज्ञा ||४०||
देशाच्या स्वातंत्र्यासाठी | मानव कल्याणासाठी | अन्याय प्रतिकारासाठी | झिजवीन माझा देह ||४१||
१९२६
हनुमंताची मूर्ती स्थापिली | जनांत शक्ती जागविली | तशीच भक्ती आरंभिली | मराठवाडयात बोरी गावी ||४२||
हिंगोली जिल्ह्यात | सप्ताह होता कळमनुरीत | ताकद जन शक्तीत | दीड लाख लोकं जमली ||४३||
गाडगेबाबा आले होते | दासगणूही आले होते | जगद्गुरू शंकराचार्यहि होते | एकता सप्ताहासाठी ||४४||
कीर्तनकार आले होते | प्रवचनकार आले होते | तीनशे ब्राह्मणहि आले होते | यज्ञ स्वाहाकारासाठी ||४५||
स्वतः जगद्गुरूनी | स्वतःची शाल देऊनी | धर्म भास्कर पदवी देऊनी | श्रींचा गौरव केला ||४६||
सर्व धर्माचे जन जमले | धन धान्य श्रींनी वाटले |  स्वतः फकीर राहिले | निस्पृह वृत्तीने ||४७||
यज्ञ समाप्तीवेळी | वाईट एक बातमी आली | श्रद्धानंदांची हत्त्या केली | अब्दुल रशीद याने ||४८||
अन्याय अग्नी पेटला | श्रींनी कुराणाचा अभ्यास केला | इतिहांस पुन्हा वाचला | लढण्यासाठी ||४९||
धर्म भेद नसावा | राष्ट्रनिष्ठा हा धर्म असावा | श्री शिवाजींचा आदर्श ठेवावा | सांगितले लोकांना ||५०||
गुरु गोविंदसिंग आदर्श मानले | निजामाविरुद्ध बोलले | ब्रीद प्रचारित केले | वीरता हीच अस्मिता ||५१||
व्यायाम शाळा आणि दले | ठिकठिकाणी स्थापिले | जन जागृत केले | एका महिन्यात लाखो ||५२||
धर्मांतर बंद पाडले | जहाल व्याख्यान केले | जे निजामंस झोंबले | किंग कोठी हैदराबादेत ||५३||
मग सी.आय.डी.धाडले | पण तेही व्याख्यानात गुंतले | पित्त आणखी खवळले | निजाम राजाचे ||५४||
१९२८
हिंदुना पुन्हा स्वधर्मात आणले | जाती भेदांस दूर केले | परिषदेचे आयोजन केले | देऊळगावराजात ||५५||
निजामाने आमिष दाविले | पाठबळ देऊ म्हटले | आठशे रुपये देतो म्हटले | धर्म निष्ठा मारण्यासाठी ||५६||
बदल्यात मौन मागितले | पण महाराजांनी नाकारले | म्हणून निजामाने हद्दपार केले | निजाम स्टेट मधून ||५७||
१९२९
श्रींनी आपले तत्व जपले | मग कार्यकर्ते भेटले | विपत्तीत साथीदार भेटले | साथीने लढण्यासाठी ||५८||
आता लोकही धीट झाले | श्रींच्या मदतीने उभे राहिले | निजामाविरुद्ध लढू लागले | श्रींच्या स्फूर्तीने ||५९||
कर्तृत्ववान जनशक्ती उभारणे | जनतेला वळण लावणे | देशाला स्वतंत्र करणे | त्रिसूत्री महाराजांची ||६०|| 
जन जागरण चालूच ठेवले | मुक्तेश्वर दलाचे जाळे विणले | शुद्धीचे सत्र सुरु केले | श्री पाचलेगावकरांनी ||६१||
कमिशन विरुद्ध असंतोष पसरविला | ठराव पास केला | मुक्ततेसाठी आवाज दिला | श्री सावरकरांसाठी ||६२||
सावरकरांनी निमंत्रण दिले | महाराज रत्नागिरीस गेले | पतित पावन मंदिर खुले झाले | व्याख्यानानंतर ||६३||
हिंदू महासभेने स्वागत केले | रानड्यांच्या हस्ते मानपत्र दिले | दीड तास व्याख्यान झाले | तेथेही श्रींचे ||६४||
नागपूर ते कुरुंदवाडी | हैद्राबाद ते मुंबई | वरोडा, संगमनेर, घाटजी | मंगळूर,जुन्नर वणी | असे दौरे झाले ||६५||
बुलढाणा, यवतमाळ, अमरावती | अहमदनगर, वाशीम, आदी | अकोला इथेही | दीडशे शाखा स्थापिल्या  ||६६||
 १९३०-३२
कायदे भंगाच्या चळवळीत | लोक झाले संघटीत | महाराजांच्या नावे वारंट | लॉर्ड वेलिंग्टन,निजामाने काढले ||६७||
कळताच श्री भूमिगत झाले | लपत छपत पळाले | पाच महिने राहिले | फ्रेंच स्टेट पोन्डिचेरी इथे ||६८||
मग वर्धा इथे आले | वकील मंडळींच्या बैठकीत बसले | मग चान्द्यास गेले | भूमिगत राहून ||६९||
देशमुखांकडे गुप्तपणे राहिले | भक्तांनी जामीन पत्र बनविले | मग वारंट रद्द झाले | श्रीना पकडण्याचे ||७०||
१९३४
भक्तांनी इमारत बांधली | एकोणीसशे चौतीस साली | भगवान शंकरांची स्थापना केली | खामगावी आश्रमात ||७१||
१९३९
राज्याचे सभासद होणे भाग पडले | गोविंदराव भावे यांसी दत्तक गेले | मग नागरिक झाले | ब्रिटीश राज्याचे ||७२||
डॉ.हेगडेवार सरसंघचालक | बाबाराव सावरकर तरुण सभेचे चालक | दोघांनी श्रीना दिली हाक | संस्था उभारण्यासाठी ||७३||
अट घातली शुद्धीकरणाची | संस्था निष्ठा महत्वाची | पण राष्ट्रनिष्ठा त्याहून महत्वाची | सांगितले श्रींनी ||७४||
अटींचे समर्थन केले | चर्चा बोलणे झाले | तिघेजण एकत्र आले | देश रक्षण, स्वातंत्र्यासाठी ||७५|| 
१९३५
महात्मा गांधींची भेट झाली | राजकीय बोलणी झाली | शस्त्र धरण्याची मागणी केली | श्री महाराजांनी ||७६||
पुन्हा दुसरी भेट झाली | सापांविषयी चर्चा झाली | सव्वा तास चर्चा रंगली | नाग पंचमी निमित्त ||७७||
जमनालालहि भेटले | डॉ.राजेंद्रप्रसाद भेटले | सरदार पटेलांनी विचारले | दुष्ट माणसांचे काय करावे? ||७८||
दुष्ट हिंदू किंवा अन्य असो | सख्खा मामा कंस असो | की आपला बाप हिरण्यकश्यपू असो | त्याची गय न करणे ||७९||
पूर्वजांचा कित्ता गिरवावा | श्री कृष्णाचा आदर्श ठेवावा | दुष्टांचा प्रतिकार करावा | सांगितले श्री महाराजांनी ||८०||
महाराज जामिनावर होते | म्हणून थोडे स्वस्थ होते | १९३५ पर्यंत गप्प होते | पण निखारा धुमसत होता ||८१||
१९३६-१९४०
एक वेळ गंगेचा प्रवाह थांबेल | वारा वहायचा थांबेल | सरकार आदेशहि काढेल | श्रींनी गप्प बसावे ||८२||
पण श्रींनी सरकारला बजावले | निक्षून सांगितले | जाहीर आव्हान दिले | मी आता थांबणार नाही ||८३||
मिळणार नाही भीक मागून | नाही मिळणार शांत बसून | मनगटातील ताकद दाखवून | मिळेल स्वातंत्र्य ||८४|| 
संकेश्वर ते मुंबई पर्यंत | विदर्भ, मध्यप्रदेशा पर्यंत | जम्मू काश्मीर दिल्ली पर्यंत | श्रींनी प्रचार केला ||८५||
हिंदुनी स्वागत केले | गुरुद्वा-यानी सत्कार केले | खणखणीत व्याख्यान झाले | आर्या समाज उत्सवात ||८६||
श्रींचे सर्वत्र दौरे झाले | किर्लोस्कर वाडीत भाषण झाले | किर्लोस्कर म्हणाले | सहाय्यक मंडळ स्थापुया ||८७||
सर्वांनी मनावर घेतले | स्थापिली ग्रामरक्षण दले | मिलिटरी सेक्रेटरीहि थक्क झाले | पाहुनी औंध संस्थानात ||८८||
सावरकरांशी भेट झाली | संघटना तत्वज्ञानावर चर्चा झाली | हिंदू संघटनेवर बोलणी झाली | दादर इथे ||८९||
इसाईकरण थांबविले | धर्मांतरण थोपविले | हिंदूंचे शुद्धीकरण केले | ह्याच काळात नांद्रे मिरज इथे ||९०||
संघाच्या शाखा स्थापिल्या | हिंदू महासभेच्या शाखाही स्थापिल्या | प्रचार फे-या काढल्या | श्रींनी सर्वत्र ||९१||
ब्रिटिशावर कडाडले | सत्त्याग्रहींचे सत्कार केले | लोकमत जागृत केले | हिंदी राष्ट्र भाषेसाठी ||९२||
पुण्यातहि दौरे काढले | जन जागृत झाले | पंचवीस हजार लोक जमले | शनिवार वाडयात ||९३||
श्री सभेचे अध्यक्ष झाले | सावरकरांचे भाषण झाले | लष्करभरतीचे आवाहन केले | हजारो लोकांसमक्ष ||९४||
पाकिस्तान योजनेस विरोध केला | सैनिकीकरणाचा प्रचार केला | आवाज बुलंद केला | ब्रिटिशा विरुद्ध ||९५||
१९४१-४२
परवा न केली जीवाची | हिंदू संघटन देवाची | म्हणजे शिवाजी महाराजांची | मिरवणूक काढली ||९६||
राजपूत जाटांची जमवा जमाव केली | हिंदू राष्ट्र सेना स्थापिली | सेना शस्त्रसज्ज झाली | ग्वाल्हेर इथे ||९७||
खामगावी संघटन यज्ञ झाला | सव्वा लाख जमाव जमला | पुढे सामील झाला | "चले जाओ"आंदोलनात ||९८||
१९४३-१९४७
धर्मरक्षण गरजेचे होते | स्वातंत्र्य हे लक्ष्य होते | विश्व कल्याण उद्दिष्ट होते | घोषणा झाली ग्वाल्हेरात ||९९||
दिल्ली,मध्य प्रांतात | व-हाड,महाराष्ट्र,सांगलीत |  कोंकण मुंबई पुण्यात | १२००० सैनिक उभे केले ||१००||
ख्रिश्चनांचा वाढला उच्छाद | फॉनवेल होता उजवा हात | मांडला,जबलपूर जिल्ह्यात | धर्मांतरण वाढले होते ||१०१||
महाराज तिथे गेले | फॉनवेलांस सहकुटुंब शुद्ध केले | स्वधर्मांत घेतले | शाळेमधे त्यालाच शिक्षक केले ||१०२||
ब-हाणपुरांत तेच होते | तिथे मुस्लीमांनी बाटविले होते | लाख लोक उपस्थित होते | त्यांचीही शुद्धी केली ||१०३||
२५००० जमाव जमला | लोकसंघटना यज्ञ केला | खर्च श्री तुकाराम कारभारी याने केला | पवनी (भंडारा) इथे ||१०४||
सशस्त्र मुस्लिम चालून आले | श्रींवर आक्रमण झाले | हिंदूराष्ट्र सैनिकांनी रक्षण केले | शोपूर इथे ||१०५||
चिखलद-यात श्री भवानी | लोणीत श्री विठ्ठलरुक्माई | स्थापिल्या श्री हनुमंत मूर्ती | अकोडा,पवई,उज्जैन इथे ||१०६||
इंदोर राज्यीं सावेर परगण्यात | मुस्लीमांच्या तावडीत | २००० भिल्ल लोकांत | जागुती करून परिवर्तन केले ||१०७||
खामगाव आणि ग्वाल्हेरात | हिंदू संघटन आश्रमांचे केले ट्रस्ट | मग जनतेच्या हातांत | सुपूर्द केले ||१०८||
सशस्त्र वीर होते जमले | ६००० चे पथक जमले | श्रींनी समाधान व्यक्त केले | पिछोर ग्वाल्हेर इथे ||१०९||
महान संघटनेचे कार्य साधले | देशोद्धाराचे काम केले | देशाचे मनगट मजबूत केले | स्वातंत्र्यासाठी ||११०||
भारत देश स्वतंत्र झाला | पण देश दुभंगला | भारत,पाकिस्तान विभाजनाने पोळला | श्रीना दुःख झाले ||१११||
भारताला स्वातंत्र्य मिळाले | श्रींचे उद्दीष्ट पूर्ण झाले | हिंदूसेना दल सुपूर्द केले | सेना दलाकडे ||११२||
धावपळीने स्वास्थ्य बिघडले | श्री आता अलिप्त झाले | भिवापूर, गायमुख इथे राहिले | अनुष्ठानासाठी ||११३||
नागपूर,रायपुर इथला तुरुंगवास | बुलढाण्यातील कारावास | भिवपुरच्या स्थान बद्धतेचा त्रास | भोगला श्रींनी ||११४||
२० वर्षा नंतर श्री माहेरी आले | लोकांचे मेळे भरू लागले | विधायक कार्यासाठी वाहून घेतले | श्रींनी आपले जीवन ||११५||
श्रींच्या जन्मावेळी जे स्वामी होते | १९४६ ला खामगावी येऊन गेले होते | ते पुन्हा आले होते | श्रीना भेटण्यांस ||११६||
स्वामींचे वय १२५ वर्षे होते | स्नान संध्या चालू होते | जप आदीही चालू होते | याही वयामधे ||११७||
शेकडो गावातील लोकांमधे | आदर होता मनामधे | तेच दत्त वाडीत आलें होते | स्वामी पुन्हा एकदा ||११८||
शके १९७१ पौ शु.एकादशी | काय झाले ह्या दिवशी | गायत्री बाढ बिजानिशी | स्वामींनी दिले श्रीना ||११९||
संस्थान संचारेश्वराच्या स्वाधीन केले | स्वामी व श्री एकत्र बसले | स्वामी पंचत्वात विलीन झाले || श्रींच्या मांडीवर ||१२०||
हजारो लोक जमले | दुःखाश्रु डोळ्यांत दाटले | भक्त विरहाने तळमळले | स्वामी गेले म्हणून ||१२१||
वाडीजवळ आठ मैलांवरती | गोदावरी नदी तीरावरती | वाळूने भरलेल्या रांजणासोबती | देह बांधला स्वामींचा ||१२२||
खडका नामे भागांत | गोदावरी नदी तीरांत | गोदा माईच्या कुशीत | सांगितल्याप्रमाणे स्वामी विसावले ||१२३|| 
स्वामी जसे गेले | तसेच पात्रातून पुन्हा आलें | आश्चर्य हजारोनी पाहिले | एक महिन्यानंतर ||१२४||       
महाराज तेथे पोचले | राहिल्या क्रियांस पूर्ण केले | मग स्वामी ते कायमचे गेले | हा आहे गूढ विषय ||१२५||
दारिद्र्य,अज्ञान,विषमता | अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता | निरसण्या असमानता | मुक्तेश्वर आश्रम स्थापिले ||१२६||
कृषीसेवा आणि श्रमदान | लोकांस दिले ज्ञानदान | रक्तदान तसेच अन्नदान | आयोजिले ठिकठिकाणी ||१२७||
गावातील संपे वैर | व्यसन जाई वेशी बाहेर | छळ, गुंडगिरी होई हद्दपार | महाराज येतां गावांत ||१२८||
त्यासाठी श्रींनी हांत जोडले | प्रसंगी उपोषणही केले | सदैव प्रयत्न केले | समाजांत एकीसाठी ||१२९||
लहान मुलांवर प्रेम होते | तत्व कधीच सोडले नव्हते | विनोद,गांभीर्य दोन्ही होते | व्याख्यानात श्रींच्या ||१३०||
अस्पृश्यता, व्यसनमुक्ती | भुताटकी व भानामती | त्या विरुद्ध उभारली जनशक्ती | जन कल्याणासाठी ||१३१||
कधी एकटे, कधी सर्वांसोबत | तर कधी वाहनांत | कधी पायी दरी खो-यात | श्रींनी ध्येय्य तेवत ठेवले ||१३२|| 
कोणी निंदा करोत | कोणी फुलांचा वर्षाव करोत | कोणी स्तुती करोत | श्रींनी सोडले नाही ध्येय्य ||१३३||
जीवन अर्पिले देवासाठी | जीवन अर्पिले देशासाठी | सर्वस्व अर्पिले धर्मासाठी | श्री पाचलेगावकरांनी ||१३४||
महाराज जसे जगात आलें | तसेच होते राहिले | स्वतःसाठी काही न ठेविले | लंगोटी नेसले आयुष्यभर ||१३५||
१६/८/१९८६
शुद्ध एकादशी,महिना श्रावण | महाराजांचे झाले देहावसान | सकाळी सात दरम्यान | जे.जे.इस्पितळ मुंबई इथे ||१३६||
जुन्या पिढ्या जातांत | नव्या पिढ्या येतांत | देशभक्त, राष्ट्रसंत अमर होतात | जगाच्या इतिहासात ||१३७||
श्रींचा घेउनी वसा | चालविला पाहिजे वारसा | संदेश घेऊन पाचलेगावकरांचा | श्रमदान राष्ट्रसेवेचा ||१३८||
श्रीपाचलेगावकर गुरूमूर्ती | सर्वदूर ज्यांची पसरली कीर्ती | चला गाऊ त्यांची महती | जनजागृती करून ||१३९||
श्री संचारेश्वर चरित्र संक्षिप्त | पोहोचावे सर्व लोकांप्रत | जन्मशताब्दीचा साधुनी मुहूर्त | लिहिले सर्वांसाठी ||१४०||   
श्री गुरूंचे नाव घेतो | संक्षिप्त स्तोत्र हे पूर्ण करितो | भक्तीभावे अर्पण करितो | श्री संचारेश्वर चरणी ||१४१||  
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः | शुभम भवतु | शुभम भवतु | जय हिंद | भारत माता की जय | तथास्तु |
संदर्भ: महाजाल
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९          
Email ID - kharichavata@gmail.com
 
जय जयकार 
श्री मुक्तेश्वर महाराज की जय | छत्रपती शिवाजी महाराज की जय | महाराणा प्रताप सिंह की जय |
गुरु गोविंद सिंघ की जय | सब संतन की जय | जय जय रघुवीर समर्थ | समर्थ रामदास स्वामी महाराज की जय |
बजरंग बलभीम की जय | श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय | श्री नृसिंह सरस्वति स्वामी महाराज की जय |
श्री वासुदेवानंद स्वामी महाराज की जय | श्री नारायण दत्तानंद स्वामी महाराज की जय |
श्री माधवाश्रम स्वामी महाराज की जय | श्री सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय | 

Monday, 29 October 2012

PUNE BUS DAY - SURESH PITRE - ।। साजरा करा बस डे ।।

PUNE BUS DAY - 1 NOVEMBER 2012 - 
नमस्कार,
पुणे शहरामधे १ नोव्हेंबरला बसने प्रवास करून बस डे साजरा करण्याचे 
ठरविले आहे त्या निमित्त पुणेकरांना "बस डे" साठी हार्दिक शुभेच्छा. 
आणि असा बस डे सर्वच शहरामधे साजरा व्हावा अशी अपेक्षा.
।। साजरा करा बस डे ।।
फोफावली भारतात शहरे | रस्ते झाले जाम रे ।
कर्कश्श वाजती हॉर्न रे | एकविसाव्या शतकात ||१||
इंधन दरवाढ झाली । दुचाकी,चारचाकी महाग झाली ।
वाहनांची संख्या वाढली । सर्वच महानगरात ।।२।।
रिक्षाचा प्रवास महाग । बसने थोडा स्वस्त प्रवास ।
मिळेल मोकळा श्वास । वाहने कमी होता ।।३।।
दुचाकीचा प्रवास असुरक्षित । बसचा प्रवास सुरक्षित ।
जनहो तुम्ही सुशिक्षित । जाणा बसचे महत्व ।।४।।
ठाणे-पुणे आहे बस । वातानुकुलीत आहेत बस ।
तशीच चालवा मिनीबस । छोटया रस्त्यांवर ।।५।।
स्त्रियांसाठी खास आसने । अपंगासाठी राखीव आसने ।
प्रवास होईल छानपणे । बसने करावा प्रवास ।।६।।
एकदा असतो फादर्स डे । तसाच असतो मदर्स डे ।
साजरा व्हावा जागतिक बस डे । सर्व देशांत ।।७।।
वाचेल वाहनांचे इंधन । वाचेल देशाचे परकीय चलन ।
भारत देश होईल सधन । बसने प्रवास करता ।।८।।
सवय करा बस प्रवासाची । नाही गरज हेल्मेटची ।
आहे हमी सुरक्षेची । बसमधे प्रवाशांना ।।९।।
वाढली सर्वत्र लोकसंख्या । वाढता बसची संख्या ।
कमी होईल संख्या । रस्त्यावरील वाहनांची ।।१०।।
बसची संख्या वाढवा । बसचे थांबे वाढवा ।
बसनेच प्रवास करावा । जास्तीत जास्त लोकांनी ।।११।।
वाढले आता प्रदूषण । न द्यावे कोणाला दूषण ।
पुढाकार घ्यावा आपण । बस प्रवासासाठी ।।१२।।
इंधनाची गरज वाढली | इंधनाची किंमत वाढली |
विषारी द्रव्ये हवेत भिनली | कर्करोगांस कारण ||१३||
वायु, ध्वनी प्रदूषण वाढले | प्रदूषणाने आजार वाढले |
औषधांचे व्यापार वाढले | आपल्या भारत देशामधे ||१४||
डबल डेकर बस असावी | बसची महती सांगावी |
पर्यावरणाची काळजी घ्यावी | बसने प्रवास करून ||१५||
बसचाच विचार व्हावा | बसचाच प्रचार करावा |
बससाठी आग्रह धरावा | प्रदूषण रोखण्यासाठी ||१६||
चीन पेट्रोलचे महत्व जाणतो | जर्मनी इंधनाला महत्व देतो |
भारतीय मात्र उधळण करतो | परकीय चलनाची ||१७||
इंधन आता स्वस्त नाही | पार्किंगला जागा शिल्लक नाही |
तरीही बसला प्राधान्य नाही | ह्या भारत देशामधे ||१८||
चीनचे परकीय चलन वाचते | जपानचे परकीय चलन वाचते |
भारताचे चलन वाया जाते | वारेमाप इंधन आयातीवर ||१९||
वाढले जागतिक तापमान | बिघडले सृष्टीचे तानमान |
पर्यावरणाचे ठेवावे भान | म्हणून बसनेच करा प्रवास ||२०||
बसचा अभ्यास व्हावा सखोल | शुद्ध हवेचे जाणावे मोल |
सुखी करावे जीवन अनमोल | आपले आणि भावी पिढीचे ||२१||
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला,
राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम) ,
पिन कोड क्र. – ४००६०१,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com