Monday, 29 October 2012

PUNE BUS DAY - SURESH PITRE - ।। साजरा करा बस डे ।।

PUNE BUS DAY - 1 NOVEMBER 2012 - 
नमस्कार,
पुणे शहरामधे १ नोव्हेंबरला बसने प्रवास करून बस डे साजरा करण्याचे 
ठरविले आहे त्या निमित्त पुणेकरांना "बस डे" साठी हार्दिक शुभेच्छा. 
आणि असा बस डे सर्वच शहरामधे साजरा व्हावा अशी अपेक्षा.
।। साजरा करा बस डे ।।
फोफावली भारतात शहरे | रस्ते झाले जाम रे ।
कर्कश्श वाजती हॉर्न रे | एकविसाव्या शतकात ||१||
इंधन दरवाढ झाली । दुचाकी,चारचाकी महाग झाली ।
वाहनांची संख्या वाढली । सर्वच महानगरात ।।२।।
रिक्षाचा प्रवास महाग । बसने थोडा स्वस्त प्रवास ।
मिळेल मोकळा श्वास । वाहने कमी होता ।।३।।
दुचाकीचा प्रवास असुरक्षित । बसचा प्रवास सुरक्षित ।
जनहो तुम्ही सुशिक्षित । जाणा बसचे महत्व ।।४।।
ठाणे-पुणे आहे बस । वातानुकुलीत आहेत बस ।
तशीच चालवा मिनीबस । छोटया रस्त्यांवर ।।५।।
स्त्रियांसाठी खास आसने । अपंगासाठी राखीव आसने ।
प्रवास होईल छानपणे । बसने करावा प्रवास ।।६।।
एकदा असतो फादर्स डे । तसाच असतो मदर्स डे ।
साजरा व्हावा जागतिक बस डे । सर्व देशांत ।।७।।
वाचेल वाहनांचे इंधन । वाचेल देशाचे परकीय चलन ।
भारत देश होईल सधन । बसने प्रवास करता ।।८।।
सवय करा बस प्रवासाची । नाही गरज हेल्मेटची ।
आहे हमी सुरक्षेची । बसमधे प्रवाशांना ।।९।।
वाढली सर्वत्र लोकसंख्या । वाढता बसची संख्या ।
कमी होईल संख्या । रस्त्यावरील वाहनांची ।।१०।।
बसची संख्या वाढवा । बसचे थांबे वाढवा ।
बसनेच प्रवास करावा । जास्तीत जास्त लोकांनी ।।११।।
वाढले आता प्रदूषण । न द्यावे कोणाला दूषण ।
पुढाकार घ्यावा आपण । बस प्रवासासाठी ।।१२।।
इंधनाची गरज वाढली | इंधनाची किंमत वाढली |
विषारी द्रव्ये हवेत भिनली | कर्करोगांस कारण ||१३||
वायु, ध्वनी प्रदूषण वाढले | प्रदूषणाने आजार वाढले |
औषधांचे व्यापार वाढले | आपल्या भारत देशामधे ||१४||
डबल डेकर बस असावी | बसची महती सांगावी |
पर्यावरणाची काळजी घ्यावी | बसने प्रवास करून ||१५||
बसचाच विचार व्हावा | बसचाच प्रचार करावा |
बससाठी आग्रह धरावा | प्रदूषण रोखण्यासाठी ||१६||
चीन पेट्रोलचे महत्व जाणतो | जर्मनी इंधनाला महत्व देतो |
भारतीय मात्र उधळण करतो | परकीय चलनाची ||१७||
इंधन आता स्वस्त नाही | पार्किंगला जागा शिल्लक नाही |
तरीही बसला प्राधान्य नाही | ह्या भारत देशामधे ||१८||
चीनचे परकीय चलन वाचते | जपानचे परकीय चलन वाचते |
भारताचे चलन वाया जाते | वारेमाप इंधन आयातीवर ||१९||
वाढले जागतिक तापमान | बिघडले सृष्टीचे तानमान |
पर्यावरणाचे ठेवावे भान | म्हणून बसनेच करा प्रवास ||२०||
बसचा अभ्यास व्हावा सखोल | शुद्ध हवेचे जाणावे मोल |
सुखी करावे जीवन अनमोल | आपले आणि भावी पिढीचे ||२१||
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला,
राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम) ,
पिन कोड क्र. – ४००६०१,
भ्रमणध्वनी – ९००४२३०४०९,
Email ID - kharichavata@gmail.com

No comments:

Post a Comment