Shri Narsinha Sanchareshwar Pachle
Gavkar Maharaj sankshipt charitra katha saar stotra
|| श्री नरसिंह संचारेश्वर पाचलेगावकर महाराज संक्षिप्त चरित्र कथा सार स्तोत्र ||
श्री गणेशाय नमः | श्री प्रयाग माधवाय नमः | श्री दुर्गा देव्यै नमः | श्री विन्ध्यवासिनीदेव्यै नमः ||१||
श्रीगुरुभ्यो नमः | श्रीवासुदेवानंदसरस्वतीस्वामी नमः | श्रीमाधवनाथस्वामी नमः | श्रीसंचारेश्वर नमः ||२||
ही आहे श्रीगुरु प्रेरणा | लिहावया स्तोत्र रचना | सुरेश हा निमित्त जाणा | श्री सरस्वतींस वंदितो ||३||
भारत ही ऋषींची भूमी | भारत ही संतांची भूमी | शूर देशभक्तांची भूमी | पवित्र पावन भारत माता ||४||
निवृत्त्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई | संत शिष्यांची असे आई | पद स्पर्शाने पावन होई | महाराष्ट्र संतभूमी ||५||
वडील श्री राजाराम पंत | आई कृष्णाबाई देव भक्त | सुशील हे दाम्पत्य | रहात होते पाचले गावी ||६||
८/११/१९१२
भगवद भक्त दाम्प-त्यापोटी | महाराष्ट्र पुण्य भूमीवरती | जन कल्याणासाठी | बालक एक जन्मले ||७||
शके अठराशे चौतींस | अश्विन कृष्ण चतुर्दशींस | मंगल प्रभाती समयांस | सुपुत्र हा अवतरला ||८||
नरक चतुर्दशी,उत्सव दिवाळी | असुरांची करण्या होळी | दिव्य शक्ती ही अवतरली | मानव देही ||९||
पाचले गाव, तालुका जिंतूर, जिल्हा परभणीत | महाराष्ट्र पावन भूमीत | भारत देशांत | संतबीज रुजले ||१०||
हिंदू संस्कृती प्रमाणे सगळे | नामकरण विधी झाले | नरसिंह असे नाव ठेविले | लहान बाळाचे ||११||
बाळ पाचले गावात वाढले | काहि महिन्यांचे झाले | तेव्हा दत्त वाडीचे तपस्वी आलें | श्री माधवाश्रम स्वामी ||१२||
स्वामिनी बाळांस पाहिले | अतींद्रिय ज्ञानाने जाणले | संचारेश्वर संबोधिले | परतले पाचले गावातून ||१३||
नृसिंह खोडकर मूर्ती | पुराण, भजन बाळाची आवडी | नारू,अप्पा पावश्या,धोंडू आदी | मित्र चार विविध जातीचे ||१४||
सवंगडी सोबती असताना | त्यांना दूध पाजल्याविना | बाळ कधीच दूध घेईना | दूध पाजी आधी मित्रांसी ||१५||
शाळेची आवड बाळांस नव्हती | शाळेतून पळ काढती | मुक्तेश्वर स्वयंभू पिंडीजवळ जमती | सवंगड्या सोबत ||१६||
गावात काहीना व्यसन जडले | श्री तेव्हा खूप चिडले | दारूच्या मडक्यात मातीस टाकले | राग येउनी ||१७||
महाराज नेसती लंगोटी | लोक आदराने कौतुक करती | अंगा खांद्यावर घेऊन फिरती | पाचले गावात ||१८||
आठव्या वर्षीची गोष्ट ऐका | नाग पंचमीचा दिवस बर का | खरा नाग पूजेसाठी आणू का | नृसिंहाने विचारले ?||१९||
आईने सहज हो म्हंटले | श्री खरांच नाग घेऊन आलें | सर्व लोक भीतीने पाळले | खरा नाग पाहतां ||२०||
आता नाग पूजावा कोणी | नागांस खाली ठेउनी | नागांस पूजिले स्वतः श्रींनी | श्री झाले नागधारी ||२१||
ज्योतिर्लिंग औंढा,नागनाथ,ओंकारेश्वर | अभिषेक करता शंकरावर | प्रत्यक्ष नाग ठेविला पिंडीवर | पाहिला अनेकांनी ||२२||
भस्म अंगारा फासला | गुरूंचा अनुग्रह झाला |श्रीमाधवाश्रमांनी संस्कार केला | पाचले गावांत ||२३||
श्रींना चुलत बंधु होता | त्याच्या मुंजीचा विषय होता | नृसिंहांच्या लग्नाचाही विषय होता | तेव्हा एक घटना घडली ||२४||
भक्तीत रममाण असतां | एक दृष्टांत झाला होतां | सगळ्याना तो सांगितला होतां | श्रींनी घरी येऊन ||२५||
माझे लग्न नाही होणार | आगीमधे घर जळणार | आजी आगीमधे राख होणार | असा होतां दृष्टांत ||२६||
हे ऐकून सगळे चिडले | श्रींना दूषण देऊ लागले | पण व्हायचे तेच झाले | घर जळले आगीमधे ||२७||
घराचे भस्म अंगास लाविले | श्रीबाबा घराबाहेर पडले | तीर्थक्षेत्री राहिले | औंढा, लोणार आदी स्थानी ||२८||
नंतर श्रीबाबा महाराज | श्री छोटे महाराज | श्री पाचलेगावकर महाराज | अशा नावानी प्रसिद्ध झाले ||२९||
राष्ट्रीय जीवनास स्वीकारले | देश पर्यटनाने कल्याण साधले | न्यायासाठी लढले | श्री बाबा महाराज ||३०||
मातृभूमी होती पारतंत्र्यात | जन करण्या संघटीत | महाराज मिसळले समाजात | बालमूर्ती तेरा वर्षीय ||३१||
लोकं जमू लागले | श्रींजवळ वावरू लागले | यज्ञाच्या तयारीस लागले | श्रींच्या इच्छेनुसार ||३२||
परकीयांविरुद्ध एल्गार केला | रुद्र स्वाहाकार पूर्ण झाला | राष्ट्र धर्माचा पाया रचला | तेराव्या वर्षी ||३३||
सर्वत्र श्रींची कीर्ती झाली | भूमी होती निजाम अमलाखाली | निजामाने माणसे धाडली | पैसे देण्यासाठी ||३४||
शिवराम बहादूर जहागीर मंडळी | श्रीना नेण्यांस आली | श्रींनी संपत्ती वाटली | गोर गरिबांस ||३५||
श्री गेले फिरत फिरत | पोहचले हैदराबादेत | निजाम झाला प्रभावित | बालरूप ते पाहून ||३६||
बाबांस करोडगिरी कर माफ केला | रेल्वे प्रवास मोफत दिला | दोन पोलीस सोबतिला | दिले निजामाने ||३७||
देशांत होती हलाखी | धर्म अर्थ जाती यांची | विषमता समाजात होती | शिगेला पोचलेली ||३८||
महाराजांनी अवलोकन केले | जन जागृत केले | पालखी सोहळे आयोजिले | पाचलेगाव, लोणी इथे ||३९||
पाहुनी लुबाडणूक धर्मांतरण | श्रींचे द्रवले अन्तःकरण | करीन मी धर्मरक्षण | केली त्यांनी प्रतिज्ञा ||४०||
देशाच्या स्वातंत्र्यासाठी | मानव कल्याणासाठी | अन्याय प्रतिकारासाठी | झिजवीन माझा देह ||४१||
१९२६
हनुमंताची मूर्ती स्थापिली | जनांत शक्ती जागविली | तशीच भक्ती आरंभिली | मराठवाडयात बोरी गावी ||४२||
हिंगोली जिल्ह्यात | सप्ताह होता कळमनुरीत | ताकद जन शक्तीत | दीड लाख लोकं जमली ||४३||
गाडगेबाबा आले होते | दासगणूही आले होते | जगद्गुरू शंकराचार्यहि होते | एकता सप्ताहासाठी ||४४||
कीर्तनकार आले होते | प्रवचनकार आले होते | तीनशे ब्राह्मणहि आले होते | यज्ञ स्वाहाकारासाठी ||४५||
स्वतः जगद्गुरूनी | स्वतःची शाल देऊनी | धर्म भास्कर पदवी देऊनी | श्रींचा गौरव केला ||४६||
सर्व धर्माचे जन जमले | धन धान्य श्रींनी वाटले | स्वतः फकीर राहिले | निस्पृह वृत्तीने ||४७||
यज्ञ समाप्तीवेळी | वाईट एक बातमी आली | श्रद्धानंदांची हत्त्या केली | अब्दुल रशीद याने ||४८||
अन्याय अग्नी पेटला | श्रींनी कुराणाचा अभ्यास केला | इतिहांस पुन्हा वाचला | लढण्यासाठी ||४९||
धर्म भेद नसावा | राष्ट्रनिष्ठा हा धर्म असावा | श्री शिवाजींचा आदर्श ठेवावा | सांगितले लोकांना ||५०||
गुरु गोविंदसिंग आदर्श मानले | निजामाविरुद्ध बोलले | ब्रीद प्रचारित केले | वीरता हीच अस्मिता ||५१||
व्यायाम शाळा आणि दले | ठिकठिकाणी स्थापिले | जन जागृत केले | एका महिन्यात लाखो ||५२||
धर्मांतर बंद पाडले | जहाल व्याख्यान केले | जे निजामंस झोंबले | किंग कोठी हैदराबादेत ||५३||
मग सी.आय.डी.धाडले | पण तेही व्याख्यानात गुंतले | पित्त आणखी खवळले | निजाम राजाचे ||५४||
१९२८
हिंदुना पुन्हा स्वधर्मात आणले | जाती भेदांस दूर केले | परिषदेचे आयोजन केले | देऊळगावराजात ||५५||
निजामाने आमिष दाविले | पाठबळ देऊ म्हटले | आठशे रुपये देतो म्हटले | धर्म निष्ठा मारण्यासाठी ||५६||
बदल्यात मौन मागितले | पण महाराजांनी नाकारले | म्हणून निजामाने हद्दपार केले | निजाम स्टेट मधून ||५७||
१९२९
श्रींनी आपले तत्व जपले | मग कार्यकर्ते भेटले | विपत्तीत साथीदार भेटले | साथीने लढण्यासाठी ||५८||
आता लोकही धीट झाले | श्रींच्या मदतीने उभे राहिले | निजामाविरुद्ध लढू लागले | श्रींच्या स्फूर्तीने ||५९||
कर्तृत्ववान जनशक्ती उभारणे | जनतेला वळण लावणे | देशाला स्वतंत्र करणे | त्रिसूत्री महाराजांची ||६०||
जन जागरण चालूच ठेवले | मुक्तेश्वर दलाचे जाळे विणले | शुद्धीचे सत्र सुरु केले | श्री पाचलेगावकरांनी ||६१||
कमिशन विरुद्ध असंतोष पसरविला | ठराव पास केला | मुक्ततेसाठी आवाज दिला | श्री सावरकरांसाठी ||६२||
सावरकरांनी निमंत्रण दिले | महाराज रत्नागिरीस गेले | पतित पावन मंदिर खुले झाले | व्याख्यानानंतर ||६३||
हिंदू महासभेने स्वागत केले | रानड्यांच्या हस्ते मानपत्र दिले | दीड तास व्याख्यान झाले | तेथेही श्रींचे ||६४||
नागपूर ते कुरुंदवाडी | हैद्राबाद ते मुंबई | वरोडा, संगमनेर, घाटजी | मंगळूर,जुन्नर वणी | असे दौरे झाले ||६५||
बुलढाणा, यवतमाळ, अमरावती | अहमदनगर, वाशीम, आदी | अकोला इथेही | दीडशे शाखा स्थापिल्या ||६६||
१९३०-३२
कायदे भंगाच्या चळवळीत | लोक झाले संघटीत | महाराजांच्या नावे वारंट | लॉर्ड वेलिंग्टन,निजामाने काढले ||६७||
कळताच श्री भूमिगत झाले | लपत छपत पळाले | पाच महिने राहिले | फ्रेंच स्टेट पोन्डिचेरी इथे ||६८||
मग वर्धा इथे आले | वकील मंडळींच्या बैठकीत बसले | मग चान्द्यास गेले | भूमिगत राहून ||६९||
देशमुखांकडे गुप्तपणे राहिले | भक्तांनी जामीन पत्र बनविले | मग वारंट रद्द झाले | श्रीना पकडण्याचे ||७०||
१९३४
भक्तांनी इमारत बांधली | एकोणीसशे चौतीस साली | भगवान शंकरांची स्थापना केली | खामगावी आश्रमात ||७१||
१९३९
राज्याचे सभासद होणे भाग पडले | गोविंदराव भावे यांसी दत्तक गेले | मग नागरिक झाले | ब्रिटीश राज्याचे ||७२||
डॉ.हेगडेवार सरसंघचालक | बाबाराव सावरकर तरुण सभेचे चालक | दोघांनी श्रीना दिली हाक | संस्था उभारण्यासाठी ||७३||
अट घातली शुद्धीकरणाची | संस्था निष्ठा महत्वाची | पण राष्ट्रनिष्ठा त्याहून महत्वाची | सांगितले श्रींनी ||७४||
अटींचे समर्थन केले | चर्चा बोलणे झाले | तिघेजण एकत्र आले | देश रक्षण, स्वातंत्र्यासाठी ||७५||
१९३५
महात्मा गांधींची भेट झाली | राजकीय बोलणी झाली | शस्त्र धरण्याची मागणी केली | श्री महाराजांनी ||७६||
पुन्हा दुसरी भेट झाली | सापांविषयी चर्चा झाली | सव्वा तास चर्चा रंगली | नाग पंचमी निमित्त ||७७||
जमनालालहि भेटले | डॉ.राजेंद्रप्रसाद भेटले | सरदार पटेलांनी विचारले | दुष्ट माणसांचे काय करावे? ||७८||
दुष्ट हिंदू किंवा अन्य असो | सख्खा मामा कंस असो | की आपला बाप हिरण्यकश्यपू असो | त्याची गय न करणे ||७९||
पूर्वजांचा कित्ता गिरवावा | श्री कृष्णाचा आदर्श ठेवावा | दुष्टांचा प्रतिकार करावा | सांगितले श्री महाराजांनी ||८०||
महाराज जामिनावर होते | म्हणून थोडे स्वस्थ होते | १९३५ पर्यंत गप्प होते | पण निखारा धुमसत होता ||८१||
१९३६-१९४०
एक वेळ गंगेचा प्रवाह थांबेल | वारा वहायचा थांबेल | सरकार आदेशहि काढेल | श्रींनी गप्प बसावे ||८२||
पण श्रींनी सरकारला बजावले | निक्षून सांगितले | जाहीर आव्हान दिले | मी आता थांबणार नाही ||८३||
मिळणार नाही भीक मागून | नाही मिळणार शांत बसून | मनगटातील ताकद दाखवून | मिळेल स्वातंत्र्य ||८४||
संकेश्वर ते मुंबई पर्यंत | विदर्भ, मध्यप्रदेशा पर्यंत | जम्मू काश्मीर दिल्ली पर्यंत | श्रींनी प्रचार केला ||८५||
हिंदुनी स्वागत केले | गुरुद्वा-यानी सत्कार केले | खणखणीत व्याख्यान झाले | आर्या समाज उत्सवात ||८६||
श्रींचे सर्वत्र दौरे झाले | किर्लोस्कर वाडीत भाषण झाले | किर्लोस्कर म्हणाले | सहाय्यक मंडळ स्थापुया ||८७||
सर्वांनी मनावर घेतले | स्थापिली ग्रामरक्षण दले | मिलिटरी सेक्रेटरीहि थक्क झाले | पाहुनी औंध संस्थानात ||८८||
सावरकरांशी भेट झाली | संघटना तत्वज्ञानावर चर्चा झाली | हिंदू संघटनेवर बोलणी झाली | दादर इथे ||८९||
इसाईकरण थांबविले | धर्मांतरण थोपविले | हिंदूंचे शुद्धीकरण केले | ह्याच काळात नांद्रे मिरज इथे ||९०||
संघाच्या शाखा स्थापिल्या | हिंदू महासभेच्या शाखाही स्थापिल्या | प्रचार फे-या काढल्या | श्रींनी सर्वत्र ||९१||
ब्रिटिशावर कडाडले | सत्त्याग्रहींचे सत्कार केले | लोकमत जागृत केले | हिंदी राष्ट्र भाषेसाठी ||९२||
पुण्यातहि दौरे काढले | जन जागृत झाले | पंचवीस हजार लोक जमले | शनिवार वाडयात ||९३||
श्री सभेचे अध्यक्ष झाले | सावरकरांचे भाषण झाले | लष्करभरतीचे आवाहन केले | हजारो लोकांसमक्ष ||९४||
पाकिस्तान योजनेस विरोध केला | सैनिकीकरणाचा प्रचार केला | आवाज बुलंद केला | ब्रिटिशा विरुद्ध ||९५||
१९४१-४२
परवा न केली जीवाची | हिंदू संघटन देवाची | म्हणजे शिवाजी महाराजांची | मिरवणूक काढली ||९६||
राजपूत जाटांची जमवा जमाव केली | हिंदू राष्ट्र सेना स्थापिली | सेना शस्त्रसज्ज झाली | ग्वाल्हेर इथे ||९७||
खामगावी संघटन यज्ञ झाला | सव्वा लाख जमाव जमला | पुढे सामील झाला | "चले जाओ"आंदोलनात ||९८||
१९४३-१९४७
धर्मरक्षण गरजेचे होते | स्वातंत्र्य हे लक्ष्य होते | विश्व कल्याण उद्दिष्ट होते | घोषणा झाली ग्वाल्हेरात ||९९||
दिल्ली,मध्य प्रांतात | व-हाड,महाराष्ट्र,सांगलीत | कोंकण मुंबई पुण्यात | १२००० सैनिक उभे केले ||१००||
ख्रिश्चनांचा वाढला उच्छाद | फॉनवेल होता उजवा हात | मांडला,जबलपूर जिल्ह्यात | धर्मांतरण वाढले होते ||१०१||
महाराज तिथे गेले | फॉनवेलांस सहकुटुंब शुद्ध केले | स्वधर्मांत घेतले | शाळेमधे त्यालाच शिक्षक केले ||१०२||
ब-हाणपुरांत तेच होते | तिथे मुस्लीमांनी बाटविले होते | लाख लोक उपस्थित होते | त्यांचीही शुद्धी केली ||१०३||
२५००० जमाव जमला | लोकसंघटना यज्ञ केला | खर्च श्री तुकाराम कारभारी याने केला | पवनी (भंडारा) इथे ||१०४||
सशस्त्र मुस्लिम चालून आले | श्रींवर आक्रमण झाले | हिंदूराष्ट्र सैनिकांनी रक्षण केले | शोपूर इथे ||१०५||
चिखलद-यात श्री भवानी | लोणीत श्री विठ्ठलरुक्माई | स्थापिल्या श्री हनुमंत मूर्ती | अकोडा,पवई,उज्जैन इथे ||१०६||
इंदोर राज्यीं सावेर परगण्यात | मुस्लीमांच्या तावडीत | २००० भिल्ल लोकांत | जागुती करून परिवर्तन केले ||१०७||
खामगाव आणि ग्वाल्हेरात | हिंदू संघटन आश्रमांचे केले ट्रस्ट | मग जनतेच्या हातांत | सुपूर्द केले ||१०८||
सशस्त्र वीर होते जमले | ६००० चे पथक जमले | श्रींनी समाधान व्यक्त केले | पिछोर ग्वाल्हेर इथे ||१०९||
महान संघटनेचे कार्य साधले | देशोद्धाराचे काम केले | देशाचे मनगट मजबूत केले | स्वातंत्र्यासाठी ||११०||
भारत देश स्वतंत्र झाला | पण देश दुभंगला | भारत,पाकिस्तान विभाजनाने पोळला | श्रीना दुःख झाले ||१११||
भारताला स्वातंत्र्य मिळाले | श्रींचे उद्दीष्ट पूर्ण झाले | हिंदूसेना दल सुपूर्द केले | सेना दलाकडे ||११२||
धावपळीने स्वास्थ्य बिघडले | श्री आता अलिप्त झाले | भिवापूर, गायमुख इथे राहिले | अनुष्ठानासाठी ||११३||
नागपूर,रायपुर इथला तुरुंगवास | बुलढाण्यातील कारावास | भिवपुरच्या स्थान बद्धतेचा त्रास | भोगला श्रींनी ||११४||
२० वर्षा नंतर श्री माहेरी आले | लोकांचे मेळे भरू लागले | विधायक कार्यासाठी वाहून घेतले | श्रींनी आपले जीवन ||११५||
श्रींच्या जन्मावेळी जे स्वामी होते | १९४६ ला खामगावी येऊन गेले होते | ते पुन्हा आले होते | श्रीना भेटण्यांस ||११६||
स्वामींचे वय १२५ वर्षे होते | स्नान संध्या चालू होते | जप आदीही चालू होते | याही वयामधे ||११७||
शेकडो गावातील लोकांमधे | आदर होता मनामधे | तेच दत्त वाडीत आलें होते | स्वामी पुन्हा एकदा ||११८||
शके १९७१ पौ शु.एकादशी | काय झाले ह्या दिवशी | गायत्री बाढ बिजानिशी | स्वामींनी दिले श्रीना ||११९||
संस्थान संचारेश्वराच्या स्वाधीन केले | स्वामी व श्री एकत्र बसले | स्वामी पंचत्वात विलीन झाले || श्रींच्या मांडीवर ||१२०||
हजारो लोक जमले | दुःखाश्रु डोळ्यांत दाटले | भक्त विरहाने तळमळले | स्वामी गेले म्हणून ||१२१||
वाडीजवळ आठ मैलांवरती | गोदावरी नदी तीरावरती | वाळूने भरलेल्या रांजणासोबती | देह बांधला स्वामींचा ||१२२||
खडका नामे भागांत | गोदावरी नदी तीरांत | गोदा माईच्या कुशीत | सांगितल्याप्रमाणे स्वामी विसावले ||१२३||
स्वामी जसे गेले | तसेच पात्रातून पुन्हा आलें | आश्चर्य हजारोनी पाहिले | एक महिन्यानंतर ||१२४||
महाराज तेथे पोचले | राहिल्या क्रियांस पूर्ण केले | मग स्वामी ते कायमचे गेले | हा आहे गूढ विषय ||१२५||
दारिद्र्य,अज्ञान,विषमता | अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता | निरसण्या असमानता | मुक्तेश्वर आश्रम स्थापिले ||१२६||
कृषीसेवा आणि श्रमदान | लोकांस दिले ज्ञानदान | रक्तदान तसेच अन्नदान | आयोजिले ठिकठिकाणी ||१२७||
गावातील संपे वैर | व्यसन जाई वेशी बाहेर | छळ, गुंडगिरी होई हद्दपार | महाराज येतां गावांत ||१२८||
त्यासाठी श्रींनी हांत जोडले | प्रसंगी उपोषणही केले | सदैव प्रयत्न केले | समाजांत एकीसाठी ||१२९||
लहान मुलांवर प्रेम होते | तत्व कधीच सोडले नव्हते | विनोद,गांभीर्य दोन्ही होते | व्याख्यानात श्रींच्या ||१३०||
अस्पृश्यता, व्यसनमुक्ती | भुताटकी व भानामती | त्या विरुद्ध उभारली जनशक्ती | जन कल्याणासाठी ||१३१||
कधी एकटे, कधी सर्वांसोबत | तर कधी वाहनांत | कधी पायी दरी खो-यात | श्रींनी ध्येय्य तेवत ठेवले ||१३२||
कोणी निंदा करोत | कोणी फुलांचा वर्षाव करोत | कोणी स्तुती करोत | श्रींनी सोडले नाही ध्येय्य ||१३३||
जीवन अर्पिले देवासाठी | जीवन अर्पिले देशासाठी | सर्वस्व अर्पिले धर्मासाठी | श्री पाचलेगावकरांनी ||१३४||
महाराज जसे जगात आलें | तसेच होते राहिले | स्वतःसाठी काही न ठेविले | लंगोटी नेसले आयुष्यभर ||१३५||
१६/८/१९८६
शुद्ध एकादशी,महिना श्रावण | महाराजांचे झाले देहावसान | सकाळी सात दरम्यान | जे.जे.इस्पितळ मुंबई इथे ||१३६||
जुन्या पिढ्या जातांत | नव्या पिढ्या येतांत | देशभक्त, राष्ट्रसंत अमर होतात | जगाच्या इतिहासात ||१३७||
श्रींचा घेउनी वसा | चालविला पाहिजे वारसा | संदेश घेऊन पाचलेगावकरांचा | श्रमदान राष्ट्रसेवेचा ||१३८||
श्रीपाचलेगावकर गुरूमूर्ती | सर्वदूर ज्यांची पसरली कीर्ती | चला गाऊ त्यांची महती | जनजागृती करून ||१३९||
श्री संचारेश्वर चरित्र संक्षिप्त | पोहोचावे सर्व लोकांप्रत | जन्मशताब्दीचा साधुनी मुहूर्त | लिहिले सर्वांसाठी ||१४०||
श्री गुरूंचे नाव घेतो | संक्षिप्त स्तोत्र हे पूर्ण करितो | भक्तीभावे अर्पण करितो | श्री संचारेश्वर चरणी ||१४१||
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः | शुभम भवतु | शुभम भवतु | जय हिंद | भारत माता की जय | तथास्तु |
संदर्भ: महाजाल
कवी / लेखक - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९ ,
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com

जय जयकार
श्री मुक्तेश्वर महाराज की जय | छत्रपती शिवाजी महाराज की जय | महाराणा प्रताप सिंह की जय |
गुरु गोविंद सिंघ की जय | सब संतन की जय | जय जय रघुवीर समर्थ | समर्थ रामदास स्वामी महाराज की जय |
बजरंग बलभीम की जय | श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय | श्री नृसिंह सरस्वति स्वामी महाराज की जय |
श्री वासुदेवानंद स्वामी महाराज की जय | श्री नारायण दत्तानंद स्वामी महाराज की जय |
श्री माधवाश्रम स्वामी महाराज की जय | श्री सद्गुरू संचारेश्वर महाराज की जय |

No comments:
Post a Comment