Thursday, 4 August 2011
|| पायावर उभे तेही स्वतंत्र ||
मी आधार संस्थेला भेट दिली आणि तिथे असलेल्या
मुलांची कामे पाहिली.
त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार तें करत असलेली कामे ही कौतुकास्पदच
आहेत हे जाणवले.
त्यामुळे त्यांच्यावर ही कविता लिहिण्याचे मला सुचले.
ही कविता त्या मुलांना सप्रेम समर्पित.
===========================================================
|| पायावर उभे तेही स्वतंत्र ||
जरी आहेत ते मतिमंद
त्यांनी जपलेत काहि छंद
काम तेही करती निरंतर
नका देऊ तयांस अंतर ||१||
नका समजू तयांस वेगळे
काम तेही करती आगळे
बदलेल पहा त्यांचे दैव
कष्ट तें करता सुखेनैव ||२||
नका म्हणू त्यांना वेळकाढू
तेही बनविती डस्टर खडू
काम तेही करती नीट
चक्कीवर छान दळती पीठ ||३||
देवाने दिली बुद्धी जितकी
कामे तेही करती तितकी
तेही शिकले थोडेसें तंत्र
पायावर उभे तेही स्वतंत्र ||४||
आहे जरी त्यांची मंदगती
केली पहा त्यांनी प्रगति
सर्वांस माझे एकच आवाहन
सर्वांनी त्यांना द्या प्रोत्साहन ||५||
जरा द्यावी त्यांनाही स्फूर्ती
तेही जगात मिळवतील कीर्ती
प्रत्येकाने करावा प्रयत्न अल्प
समाजाने करावा हाच संकल्प ||६||
====================================================
सुरेश रघुनाथ पित्रे.
“वैद्य सदन”, पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
|| शहरं बकाल करू नका ||
|| शहरं बकाल करू नका || |
कचरा नाल्यात फेकू नका प्लास्टिक पिशव्या वापरू नका पिशव्या गटारात टाकू नका शहरं खराब करू नका ||१|| गुटखा तम्बाखू खाऊ नका जीव धोक्यात घालू नका पचा पचा थुंकू नका शहरं गलिच्छ करू नका ||२|| वीज फुकट घालवू नका पाणी वाया दवडू नका रस्त्यात खड्डे खणू नका धुळीचे आगार बनवू नका ||३|| पेट्रोल फुकट घालवू नका गाड्या उगाच चालवू नका प्रदूषण वाढले विसरू नका श्वास मोकळा गमवू नका ||४|| झाड कोणी कापू नका पक्षांचे घरटे तोडू नका झाडांची होळी करू नका शहरांचे वाळवंट बनवू नका ||५|| नाल्यात माती टाकू नका तिवरांची जंगले तोडू नका नदी,नाले तुम्बवू नका शहरं घाण करू नका ||६|| शहरांत गर्दी वाढवू नका टॉवर उंच बंधू नका खाडीत भराव टाकू नका शहरं बकाल करू नका ||७|| |
प्रेषक / कवी - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता-"वैद्य सदन",पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम), पिन कोड क्र. - ४००६०१ संपर्क - ०२२ -२५३३३८६९ ,२५३२६४२९ , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ |
|| गांव आणि शहर ||
|| गांव आणि शहर || शहरात शोधावे लागते एखादे झाड गावात बघावे तिकडे माडच माड ||१|| शहरात असते शुद्ध क्लोरिनचे पाणी गावात असते निर्मळ झ-याचे पाणी ||२|| गावात मिळते गाईचे धारोष्ण शुद्ध दूध शहरात मिळते भेसळीचे पिशवीतले दूध ||३|| शहरात गाडी धुवायला पिण्याचे पाणी असते दुष्काळी गावात प्यायला गढूळ पाणीही नसते ||४|| गावात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन भरपूर शहरात अशुद्ध हवा ,धुळीसोबत असतो धूर ||५|| सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी , ठाणे (पश्चिम) संपर्क - ०२२ - २५३३३८६९ , २५३२६४२९ भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ |
FLOOD – 26th JULY 2005 (INDIA)
FLOOD – 26th JULY 2005 (INDIA)
Oh God please stop the rain,
We lost in the flood what we had gained.
There is no space for water to drain,
Stop the rain we request you again.
Many lost their mother and father.
Who will look after their small daughter?
Nobody is there to feed bread and butter.
Too much rain we don’t want further.
Please forgive dear friend nature.
Man made mistakes, but will not do in future.
Everybody is crying see their tears.
Whenever rain comes everybody fears.
Wherever I see there is nothing but water.
Everything is wet, shirt and trouser.
Rain came with lightning and thunder,
In this heavy rain father lost his daughter.
SURESH PITRE. Chendani - THANE, Maharashtra, India
EMAIL – kharichavata@gmail.com
जीवन जगणे सोडू नको
|| जीवन जगणे सोडू नको || | |
प्रयत्न करणे सोडू नको सुख शोधणे सोडू नको काळ सरेल विसरू नको स्थिती बदलेल विसरू नको जीवन जगणे सोडू नको ||१|| इच्छा कधीच सोडू नको धीर जराही सोडू नको संधी फुकट दवडू नको वेळ वाया घालवू नको जीवन जगणे सोडू नको ||२|| आनंद शोधणे सोडू नको आनंद देणे सोडू नको निर्बल स्वतःस समजू नको हतबल जराही होऊ नको जीवन जगणे सोडू नको ||३|| रोज लढणे सोडू नको लाचार जिणे जगू नको खचून जाऊन मोडू नको तर्क वितर्क करू नको जीवन जगणे सोडू नको ||४|| नसत्या शंका काढू नको निर्भय जगणे सोडू नको अन्याय सहन करू नको भ्रष्टाचार तू खपवू नको जीवन जगणे सोडू नको ||५|| आचार चांगला सोडू नको विचार मांडणे सोडू नको स्वप्नं पाहणे सोडू नको आशेचा दीप मालवू नको जीवन जगणे सोडू नको ||६|| | नाराज होऊन परतू नको निराश होऊन हबकू नको अंधार जवळ करू नको आशेचा किरण अडवू नको जीवन जगणे सोडू नको ||७|| भूतकाळ धरून कुढू नको वर्तमान वाया घालवू नको भविष्य उज्ज्वल बिघडवू नको ध्येय्य आपुले विसरू नको जीवन जगणे सोडू नको ||८|| बोल लावून घेऊ नको टीकाकारांवर चिडू नको त्या वेडयांवर हसूहि नको मार्ग आपला सोडू नको जीवन जगणे सोडू नको ||९|| पळभर विचलित होऊ नको तीळभरही डगमगू नको शांत मुद्रा हि सोडू नको अंतीम लक्ष विसरू नको जीवन जगणे सोडू नको ||१०|| मूल्यांचे पतन नको नको संस्कार कधीही विसरू नको तत्वास मुरड घालू नको सत्याची कास सोडू नको जीवन जगणे सोडू नको ||११|| व्यसनांचा पांगुळगाडा नको व्यसनाधीनता मुळीच नको आत्महत्येचा विचारच नको जीवन प्रवास सोडू नको जीवन जगणे सोडू नको ||१२|| |
सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम) संपर्क - २५३३३८६९,२५३२६४२९, भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ |
|| पानी है जीवन ||
|| पानी है जीवन || | |
बुन्द बुन्द जतन करो | बुन्द बुन्द से तालाब भरो | तालाब स्वच्छ साफ करो | पानी है अनमोल ||१|| बहेता पानी तुम रोको | बात यहि बोलो सबको | हर एक जन आदमी को | पानी रोज चाहिए ||२|| शहर मे तालाब बान्धो | तालाब मे पानी छोडो | छत के पानी से भर दो | शहरी इमारतोमे ||३|| कुँवे मे कचरा मत फेको | जो फेके उसको रोको | जल बहाव रुकने ना दो | हमारा है यहि लक्ष्य ||४|| जल्सम्पत्ति को बचाओगे | कुँवे का पानी पिओगे | रोज पानी वापरोगे | तब होगी जलशुद्धि ||५|| रुक गया झरना पानी का | समजो अंत है जीवन का | सोच यह जो समझ सका | वही तो है इन्सान ||६|| | पानी वापरो सम्भाल के | सबको समझाओ घर जाके | पानी मिले घर घर सबको | इस कारण हेतु ||७|| मत फेको बुन्दभरभी पानी | अकारण खर्च ना करो पानी | जमा करो बुन्द बुन्द पानी | पानी है जीवन ||८|| पानी से प्यास बुझती है | पानी से खेति उगती है | अनाज से भूक मिटती है | सभी प्राणीमात्र जन की ||९|| पेडों के लिए पौधा लगाओंगे | पौधे को पानी पीलाओगे | पौधे से पेड बनाओगे | तो छाव मिलेगी सबको ||१०|| बार बार बीज बोएजा | वन सम्पत्ति बढाए जा | जल सम्पत्ति पाएजा | मिले सबको प्राणवायु ||११|| हमको बचाना है पानी | जतन करना है पानी | पौधो को देना है पानी | पुंजी है अपने भविष्य कि ||१२|| |
सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, लोअर चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१ |
Subscribe to:
Posts (Atom)