|| शहरं बकाल करू नका || |
कचरा नाल्यात फेकू नका प्लास्टिक पिशव्या वापरू नका पिशव्या गटारात टाकू नका शहरं खराब करू नका ||१|| गुटखा तम्बाखू खाऊ नका जीव धोक्यात घालू नका पचा पचा थुंकू नका शहरं गलिच्छ करू नका ||२|| वीज फुकट घालवू नका पाणी वाया दवडू नका रस्त्यात खड्डे खणू नका धुळीचे आगार बनवू नका ||३|| पेट्रोल फुकट घालवू नका गाड्या उगाच चालवू नका प्रदूषण वाढले विसरू नका श्वास मोकळा गमवू नका ||४|| झाड कोणी कापू नका पक्षांचे घरटे तोडू नका झाडांची होळी करू नका शहरांचे वाळवंट बनवू नका ||५|| नाल्यात माती टाकू नका तिवरांची जंगले तोडू नका नदी,नाले तुम्बवू नका शहरं घाण करू नका ||६|| शहरांत गर्दी वाढवू नका टॉवर उंच बंधू नका खाडीत भराव टाकू नका शहरं बकाल करू नका ||७|| |
प्रेषक / कवी - सुरेश रघुनाथ पित्रे. पत्ता-"वैद्य सदन",पहिला मजला, राघोबा शंकर रोड, चेंदणी, ठाणे (पश्चिम), पिन कोड क्र. - ४००६०१ संपर्क - ०२२ -२५३३३८६९ ,२५३२६४२९ , भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९ |
Thursday, 4 August 2011
|| शहरं बकाल करू नका ||
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment