Thursday, 4 August 2011

|| पायावर उभे तेही स्वतंत्र ||

मी आधार संस्थेला भेट दिली आणि तिथे असलेल्या 
मुलांची कामे पाहिली. 
त्यांच्या बुद्धीमत्तेनुसार तें करत असलेली कामे ही कौतुकास्पदच 
आहेत हे जाणवले. 
त्यामुळे त्यांच्यावर ही कविता लिहिण्याचे मला सुचले. 
ही कविता त्या मुलांना सप्रेम समर्पित.
===========================================================
        || पायावर उभे तेही स्वतंत्र ||

जरी आहेत  ते मतिमंद 
त्यांनी जपलेत काहि छंद 
काम तेही करती निरंतर 
नका देऊ तयांस अंतर  ||१||
नका समजू तयांस वेगळे 
काम तेही करती आगळे 
बदलेल पहा त्यांचे दैव 
कष्ट तें  करता  सुखेनैव ||२||
नका म्हणू त्यांना वेळकाढू 
तेही बनविती डस्टर खडू 
काम  तेही  करती  नीट 
चक्कीवर छान दळती पीठ ||३||
देवाने दिली बुद्धी जितकी 
कामे तेही करती तितकी 
तेही शिकले थोडेसें तंत्र 
पायावर उभे तेही स्वतंत्र ||४||
आहे जरी त्यांची मंदगती 
केली पहा  त्यांनी प्रगति
सर्वांस माझे एकच आवाहन 
सर्वांनी त्यांना द्या प्रोत्साहन ||५||
जरा द्यावी  त्यांनाही स्फूर्ती 
तेही जगात मिळवतील कीर्ती
प्रत्येकाने करावा प्रयत्न अल्प 
समाजाने करावा हाच संकल्प ||६|| 
====================================================
सुरेश रघुनाथ पित्रे.
“वैद्य सदन”, पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
संपर्क - ०२२ - २५३३३८६९ ,२५३२६४२९
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९

No comments:

Post a Comment