Thursday, 4 August 2011

जीवन जगणे सोडू नको



||  जीवन जगणे सोडू नको  ||


प्रयत्न करणे सोडू नको
सुख शोधणे सोडू नको
काळ सरेल विसरू नको
स्थिती बदलेल विसरू नको
जीवन जगणे सोडू नको ||१||
इच्छा कधीच सोडू नको
धीर जराही सोडू नको
संधी फुकट दवडू नको
वेळ वाया घालवू  नको 
जीवन जगणे सोडू नको ||२||
आनंद शोधणे सोडू नको
आनंद देणे सोडू नको
निर्बल स्वतःस समजू नको
हतबल जराही होऊ नको
जीवन जगणे सोडू नको ||३||
रोज लढणे सोडू नको
लाचार जिणे जगू नको
खचून जाऊन मोडू नको
तर्क वितर्क करू नको
जीवन जगणे सोडू नको ||४||
नसत्या शंका काढू नको
निर्भय जगणे सोडू नको
अन्याय सहन करू नको
भ्रष्टाचार तू खपवू नको
जीवन जगणे सोडू नको ||५||
आचार चांगला सोडू नको
विचार मांडणे सोडू नको
स्वप्नं पाहणे सोडू नको
आशेचा दीप मालवू नको
जीवन जगणे सोडू नको ||६||


नाराज होऊन परतू नको
निराश होऊन हबकू नको
अंधार जवळ करू नको
आशेचा किरण अडवू नको
जीवन जगणे सोडू नको ||७||
भूतकाळ धरून कुढू नको
वर्तमान वाया घालवू नको
भविष्य उज्ज्वल बिघडवू नको
ध्येय्य आपुले विसरू नको
जीवन जगणे सोडू नको ||८||
बोल लावून घेऊ नको
टीकाकारांवर चिडू नको
त्या वेडयांवर हसूहि नको
मार्ग आपला सोडू नको
जीवन जगणे सोडू नको ||९|| पळभर विचलित होऊ नको
तीळभरही डगमगू नको
शांत मुद्रा हि सोडू नको
अंतीम लक्ष विसरू नको
जीवन जगणे सोडू नको ||१०||
मूल्यांचे पतन नको नको
संस्कार कधीही विसरू नको
तत्वास मुरड घालू नको
सत्याची कास सोडू नको
जीवन जगणे सोडू नको ||११||
व्यसनांचा पांगुळगाडा नको
व्यसनाधीनता मुळीच नको
आत्महत्येचा विचारच नको
जीवन प्रवास सोडू नको
जीवन जगणे सोडू नको ||१२||


सुरेश रघुनाथ पित्रे. चेंदणी, ठाणे (पश्चिम)
संपर्क - २५३३३८६९,२५३२६४२९, 
         भ्रमणध्वनी  -  ९००४२३०४०९           

No comments:

Post a Comment